भाजपच्या वरिष्ठ नेत्याची राज ठाकरेंना ‘मनसे’ ऑफर!

पुणे | जुना मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेने आपली विचारधारा सोडली आहे. अशा वेळेस ती जागा भरून काढण्याची संधी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला आहे, असं वक्तव्य विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केलं आहे. पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने दरेकर यांचा वार्तालापाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.


शिवसेनेत मंत्रिपदावरून एक दोन नाही तर डझनभर आमदार नाराज असल्याचं समजत आहे. पण जर सेनेनं भाजपशी युती तोडली नसती तर शिवसेनेला आणखी मंत्रिपदं मिळाली असती, असंही प्रवीण दरेकर यांनी म्हटलं आहे.