म्हणून १० हजार उंटांची गोळ्या घालून केली जाणार हत्या पाच दिवसांमध्ये १० हजार उंटांची हत्या करण्यात येणार.

सध्या ऑस्ट्रेलियामधील वणवे ही जगभरामध्ये चर्चेत आहेत. एकीकडे वणव्यांबद्दल चर्चा असतानाच दुसरीकडे देशामधील काही भागांमधील दृष्काळही चर्चेत आहे. अशाच दृष्काळी भागामधील दहा हजार उंटांची हत्या करण्यात येणार आहे. विशेष प्रशिक्षण घेतलेले शिकारी हेलिकॉप्टरमधून उंटांना गोळ्या घालून त्यांना ठार करणार असल्याची माहिती समोर आली आहे. दृष्काळग्रस्त भागामध्ये आदिवास असणारे हे उंट गरजेपेक्षा अधिक प्रमाणात पाणी पीत असल्याने त्यांना ठार मारण्यात येणार आहे.


काय आहे समस्या?
‘द इंडिपेंडट’ या वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार बुधवारपासून या उंटांच्या शिकारीला सुरुवात होणार होती. अनंगू पितजांतजतजारा यंकुनितजतजारा (एपीव्हाय) या स्थानिक आदिवासी जमातीच्या नेत्यांनी परवानगी दिल्यानंतर कारवाईला सुरुवात होणार आहे. या आदिवासी जमातींच्या पाणवठ्यांमध्ये हे उंट शिरकाव करतात. अनेकदा हे उंट मोठ्या संख्येने येतात आणि नळ तसेच साठवलेले पाणी पिऊन जातात अशी तक्रार येथील स्थानिक आदिवासी जमातीच्या लोकांनी सरकारकडे केली आहे.


स्थानिक म्हणतात


उंट आमच्या अगदी एसीमधील पाणीही पितात. उंट एसीमधील पाणी पीत असल्याने आम्हाला अनेकदा उष्ण आणि अती उष्ण वातावरणामध्ये रहावे लागते,” असं एपीव्हायचे कार्यकारी सभासद असणारे मराती बाकेर यांनी ‘द ऑस्ट्रेलियन’ या वृत्तपत्राला सांगितले. या प्राण्यामुळे मोठ्याप्रमाणात ग्रीन हाऊस गॅस म्हणजेच कार्बनडाय ऑक्साइड तयार होतो त्यामुळेही त्यांची हत्या करण्याची मागणी मागील बऱ्याच काळापासून केली जात होती.


१० हजार उंट मारायला किती दिवस लागणार?


ऑस्ट्रेलियामध्ये उंटांची एकूण संख्या १२ लाखांच्या आसपास आहे. त्यामुळे पर्यावरणाला हानीकारक ठरणाऱ्या आणि आदिवासी जमातील त्रासदायक ठरलेल्या या उंटांना मारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पुढील पाच दिवसांमध्ये १० हजार उंटांची हत्या करण्यात येणार आहे.