<no title>जिंतूर तालुका मधील बोरी गाव येथे पिण्याच्या पाण्याची नासाडी. बोरी ग्रामपंचायत झोपली आहे का?

जिंतूर तालुका मधील बोरी गाव येथे पिण्याच्या पाण्याची नासाडी. बोरी ग्रामपंचायत झोपली आहे का? मराठवाडा मध्ये नेहमी पाण्याची टंचाई असताना देखील जिंतूर तालुक्यातील बोरी गावा मध्ये पाण्याचा गैर वापर होत असण्याचे दिसत आहे या परभणी जिंतूर रोड मध्ये बोरी या गावात पाण्याचे पाइपातून 24 तास पाणी वाहून जात असते तरी पण बोरी ग्रामपंचायत त्या कडे दुर्लक्ष करताना दिसत आहे.एकी कडे सांगितल्या जात कि पाणी हे जीवन आहे पाण्याच्या गैर वापर करू नये, आणि त्याच पलीकडे पाणी 24 तास वाजून जात असताना देखील कोणी लक्ष देत नाही. मग बोरी ग्रामपंचायत उखडया डोळ्याने झोपी गेली आहे का असा प्रश्न पडत आहे.