वाशी पोलिस ठाणे हद्दीत पार्क केलेल्या कारच्या काचा फोडून बॅंकेसह लॅपटॉप चोरी करणाऱ्या आरोपीस वाशी पोलिसांकडून अटक

वाशी पोलिस ठाणे हद्दीत आणि परिमंडळ 1 वाशी नवी मुंबई चे हद्दीत पार केलेल्या कारच्या काचा फोडून सीटवर असलेल्या बॅगही लॅपटॉप चोरीचे गुन्हे सतत होत असल्याने सदरच गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश माननीय पोलीस आयुक्त सो नवी मुंबई यांनी दिले होते. माननीय पोलीस उपायुक्त परिमंडळ एक नवी मुंबई यांनी सन 2019 व 2020 मधील दाखल लॅपटॉप चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याकरिता वाशी पोलीस ठाणे कडील पोलीस उपनिरीक्षक काशिनाथ माने यांच्या नेतृत्वाखाली एक स्वतंत्र पथक स्थापन केले होते.


 सदर पथकाने वाशी पोलिस ठाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजीव धुमाळ,  पोलीस निरीक्षक रवींद्र दौंडकर,  यांच्या मार्गदर्शनाखाली अहोरात्र प्रयत्न करून गुप्त बातमीदार व तांत्रिक मुद्द्यांवर तपास करून खालील नमूद गुन्ह्यातील पाहिजे,  आरोपीस सापळा रचून ताब्यात घेतले सदर आरोपीने स्वखुशीने गुन्ह्याची कबुली दिल्याने त्याला अटक करण्यात आली आहे. 


 अटक आरोपी नाव पत्ता:- रवींद्रकुमार सन्‍तलाल गोंड वय 37 वर्षे रा. मानखुर्द मुंबई.


 वर नमूद गुन्ह्यातील हस्तगत मालमत्ता-


1,75,000/-रु. किंमतीचे 09 लॅपटॉप हस्तगत करण्यात आले आहे.


 अटक आरोपी आज दिनांक.24/02/2020 रोजी पावेतो पोलीस कोठडी रिमांड मंजूरी प्राप्त असून अटक आरोपीकडे अधिक चौकशी करून आणखीन गुन्हे उघडकीस आणण्याचा प्रयत्न करीत आहेत.


 सदरची यशस्वी कामगिरी ही उपरोक्त गुन्हा क्रमांक आठ घडल्यापासून 48 तासाच्या आत माननीय पोलीस आयुक्त श्री. संजय कुमार. माननीय सहपोलिस आयुक्त श्री. राजकुमार व्हटकर. माननीय पोलीस उपायुक्त परिमंडळ 1 वाशी श्री पंकज डहाणे. माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त श्री विनायक वस्त. यांच्या मार्गदर्शनाखाली वाशी पोलिस ठाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. संजीव धुमाळ पोलीस निरीक्षक श्री. रवींद्र दौंडकर गुन्हे प्रकटीकरण अधिकारी श्री काशिनाथ माने पोलीस पथक पोलीस नाईक हिंदुराव कदम,  सुनील चिकणे,  निलेश केंद्रे, पोलीस शिपाई अविनाश मोकळे,  उत्तेश्वर जाधव,  यांनी पार पाडली आहे.