नेरुळमध्ये सफाई कामगारांना व नगरपालिकेच्या कामगारांना मोफत नाष्टा देण्यात आला.

     पूर्ण भारतामध्ये लॉकडाउन असलेल्या परिस्थितीमध्ये देखील सफाईकामगार व अन्य पालिका कामगार जीवाची कोणतीही परवा न करता आपले काम चोखपणे पूर्ण करत आहेत म्हणून आज नेरूळ बी विभागातील सेक्टर 6 मध्ये समाजसेवक श्री.मनोज मेहेर यांच्यावतीने एकविरा फास्टफूड तर्फे सफाई कामगार व नगरपालिकेच्या अन्य कामगार यांना पहाटेचा नाश्ता मोफत देण्यात आला.